CSR निधीद्वारे सर्व शासकीय कार्यालयांचा सर्वांगीण विकास

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या शाळा, आरोग्य संस्था व ICDS कार्यालयांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि सेवा गुणवत्तेच्या उन्नतीसाठी हे पारदर्शक व तांत्रिक CSR मागणी व्यवस्थापन पोर्टल कार्यरत आहे.

या पोर्टलद्वारे कार्यालय प्रमुखांना आवश्यक साहित्य, दुरुस्ती कामे, बांधकाम सुविधा तसेच यंत्रसामग्रीसाठी CSR अंतर्गत मागणी नोंदवणे, मागणी स्थिती पाहणे आणि मंजुरी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पारदर्शकपणे पूर्ण करता येते.

CEO ZP Chhatrapati Sambhajinagar

श्री अंकित
मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद,
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आपले स्वागत करत आहोत.!

प्रशासनाच्या वतीने आपणास अवाहन करु इच्छितो की, आम्ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरीकांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यासाठी शासकीय निधी व्यतिरिक्त आपल्या सारख्या यशस्वी व सामाजिक योगदान देणाऱ्या उद्योजकांच्या सहकार्याची शासनास मदत होते.

प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरीकांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, पशुपालकांचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी आपल्या सारख्या सामाजिक भान ठेवणाऱ्या व सामाजिक हित जोपासण्याचा उद्येश ठेवणाऱ्या उद्योजकांची भरीव मदत होईल,अशी आम्हास अपेक्षा आहे.

आपल्या मार्फत आम्हास आर्थीक सहाय्य केल्यास आम्ही त्यातून उत्कृष्ट शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, यांचेसाठी शाळेचे खोली बांधकाम, उपकेंद्राचे बांधकाम, अंगणवाडीतील मुलांना खेळण्याचे साहित्य, स्वच्छता गृह, स्वच्छ पाण्यासाठी पाणी शुध्दीकरण यंत्रणा, ग्रामीण भागातील कार्यालयात सोलर System, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळांमध्ये लायब्ररी, संगणक प्रिंटर, प्रोजेक्टर ई. सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. त्यामध्ये आपला सहभाग नोंदवून घेऊ इच्छितो जेणे करुन राज्यात सकारात्मक संदेश जाईल.

आम्ही आपल्या कंपनीला वेळोवेळी प्रगती अहवाल देऊ, ज्यामुळे आपण निधीचा उपयोग कसा केला जात आहे हे पाहू शकता. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमध्ये आपली मदत विकासाचे नवे मानक निर्माण करेल. कर्मचारी आणि अधिकारी आपल्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य करण्यास प्रेरित होतील.

आमचे उद्दिष्ट म्हणजे आपल्या निधीचा परिणाम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि योजनांचा लाभ मिळवणे. आपली मदत जिल्ह्यातील जीवनमान सुधारण्यात मोलाची ठरेल. आम्ही आपल्या विश्वासाला हरकत न करता पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन राखण्याचा प्रयत्न करू.

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

पोर्टलची वैशिष्ट्ये

कार्यालय डेटा व्यवस्थापन

आरोग्य / शिक्षण / ICDS विभागांतील कार्यालयांचे डिजिटल व्यवस्थापन.

CSR मागणी नोंदणी

कार्यालयांना आवश्यक सामग्री / इमारत सुविधा / यंत्रसामग्री नोंदवण्याची सुविधा.

अहवाल आणि पारदर्शकता

विभागानुसार, तालुक्यानुसार, कार्यालयानुसार रिअलटाइम रिपोर्टिंग.

आमच्याबद्दल

समाजाच्या गरजा ओळखून, पारदर्शकतेसह आणि जबाबदारीने CSR उपक्रम राबवून शाश्वत विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे.

अधिक जाणून घ्या
आमच्यासोबत भागीदारी करा

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी प्रभावी आणि परिणामकारक उपक्रम राबविण्यासाठी आमच्यासोबत सहभागी व्हा.

अधिक जाणून घ्या
विभागीय मागण्या पहा

विविध शासकीय विभाग व पंचायत समित्यांकडून सादर झालेल्या मागण्यांची माहिती पाहून टिकाऊ व सर्वसमावेशक विकासासाठी सहभाग घ्या.

मागण्या पहा
कार्यक्रम

जिल्ह्यात राबविण्यात येणारे CSR आधारित कार्यक्रम, उपक्रम व नाविन्यपूर्ण योजना येथे पाहा.

अधिक जाणून घ्या
यशोगाथा

CSR उपक्रमांमुळे घडलेले सकारात्मक बदल, प्रेरणादायी अनुभव आणि यशस्वी प्रकल्पांची माहिती येथे वाचा.

अधिक जाणून घ्या

CSR मदतीने घडलेले बदल

🏫 नवीन 6 वर्ग खोल्यांमुळे शाळा अत्याधुनिक बनली.
🏥 PHC मध्ये सौर ऊर्जा प्रणालीमुळे 24x7 आरोग्य सुविधा उपलब्ध.
👶 ICDS केंद्रात शिक्षण व पोषण साहित्य उपलब्ध झाले.
🏫 स्मार्ट क्लासरूम स्थापनेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.

FAQ

CSR मागणी कोण करू शकते?
फक्त कार्यालय प्रमुख / विभागीय अधिकारी.
CSR मंजुरी प्रक्रिया कशी?
तांत्रिक पडताळणी → वित्तीय पडताळणी → CSR समिती मंजुरी.
मंजुरीला किती वेळ?
साधारण 7 ते 21 दिवस.
CSR अंतर्गत कोणते प्रकल्प पात्र आहेत?
शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पाणीपुरवठा, सोलर सिस्टम, डिजिटल शिक्षण सुविधा इ.
CSR मागणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
कार्यालय मान्यता पत्र, गरज प्रस्ताव, अंदाजपत्रक व फोटो.
मागणीची सद्यस्थिती कशी पाहता येईल?
लॉगिननंतर डॅशबोर्डवर Pending / Approved / Rejected स्थिती दिसते.
CSR निधी कोण देऊ शकतो?
नोंदणीकृत कंपन्या व उद्योगसमूह.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अहवाल मिळतो का?
होय, प्रगती व पूर्णता अहवाल CSR दात्यास दिला जातो.